समाजभूषण

कै. श्री मारुतीराव रेळेकर

अखिल भारतीय भावसार समाजाचे सर्व उपक्रमामध्ये सक्रीय सहभागी असणारे समाजभूषण कै. मारुतीराव रेळेकर हे भावसार समाजाच्या ‘वधूवर पालक परिचय ‘ मेळाव्याचे आद्य प्रवर्तक होते. भारतात प्रथमच पुणे शहरात भावसार वधु वर पालकाकरिता मेळावा भरविण्याचा उपक्रम त्यांनी सुरु केला सुरुवातीला सूची टंक लिखित करून सायक्लोस्टाईल प्रतीमध्ये छापत होते जसे देशभरातून मागणी वाढत गेली , तसेच सूचीचे स्वरूप बदलत गेले, संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा , सुसूत्रता , देखभाल ‘काका ‘ स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन करून घेत. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आजचे स्वरूप या पालक परिचय मेळाव्याला आले आहेत. पुढे त्यांनी १० वर्षे या समितीचे अध्यक्ष पद सांभाळले. महाराष्ट्राबाहेरील राज्ये गुजरात , मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, तसेच दक्षिणेकडील कर्नाटक , आंध्रप्रदेश मधून देखील उमेदवार नावे नोंदवू लागले. या काळात त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून देशभर अनेक शहरामध्ये असे मेळावे भरविण्यास मदत केली. पुण्यातील सुनियोजित व शिस्तबद्ध मेळाव्याचा आदर्श घेऊन अनेक शहरामध्ये त्यांचे अनुकरण होऊ लागले. त्यामुळे उपवर-वधु उमेदवारांना जीवनसाथी मिळू लागले.